जालना शहरातील अनाधिकृत नळ धारकांचे सर्वेक्षण करण्याचे काम महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या साई एजन्सी मार्फत पूर्ण झाले आहे. गुरुवार दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी सांयकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या सर्वेक्षणातील अर्जांची कर विभागाच्या नोंदींशी पडताळणी करण्यात आली असता अनेक नळ कनेक्शन अनाधिकृत असल्याचे समोर आले. त्यानुसार संबंधित नागरिकांना 10,000 रुपये भरून नळ कनेक्शन नियमित करण्याची सूचना देण्यात आली होती. महानगरपालिकेने 13 सप्टेंबर 2025 रोजी लोकअदालतीचे आयोजन केले होते.