नरखेड: नरखेड नगर परिषद येथे शांततेत पडले मतदान पार ; 21 डिसेंबरला होणार निकालाची घोषणा
दोन डिसेंबरला सकाळी साडेसात ते दुपारी साडेपाच वाजता च्या दरम्यान नगरपरिषद नरखेड येथे शांततेत मतदान पार पडले. नरखेड नगराध्यक्ष पद व इतर सदस्य पदाकरिता आज मतदान झाले तर उर्वरित सदस्या करिता निवडणूका 20 डिसेंबर रोजी होणार असून या संपूर्ण निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबर रोजी घोषित होणार आहे. यामुळे आता सर्वांचे लक्ष 21 डिसेंबर कडे लागले आहे