वाशिम: वाशिम जिल्ह्यात दोन दिवसापासून अवकाळी पाऊस, सोयाबीनच्या गंज्या भिजल्याने शेतकर्यांची चिंता वाढली
Washim, Washim | Oct 30, 2025 वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून काही भागात जोरदार अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीन गंज्या भिजल्या असून त्यामधून अंकुर येण्याची भिती निर्माण झाल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. दि. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत वाशिम तालुक्यात 23.7 मी.मी. रिसोड तालुक्यात 2.9 मी.मी., मालेगांव 8.2 मी.मी., मंगरुळपीर 35.2 मीमी, मानोरा 73.1 मी.मी., व कारंजा तालुक्यात 27.9 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.