समुद्रपूर: गिरड परीसरात दहशत निर्माण करणाऱ्या वाघीण व तिच्या तिन पिल्यांचे नागरीकांना झाले दर्शन
समुद्रपुर: तालुक्यातील गिरड खुर्सापार परीसरात एक वाघीण तिचे तिनं बच्छडे व एक वाघ अश्या ५ वांघानी शेतीशिरात मुक्त संचार सुरू असल्याने शेतकरी ,शेतमजूर व नागरीकांमध्ये चांगली दहशत निर्माण केली आहे. काही खुर्सापार येथील नागरी रस्त्यावर वाघीण तिच्या तिनं बछड्याचे दर्शन झाले असून अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात या चौघांच्या हालचाली केद केल्या आहेत. एका वाघाला ३० डिसेंबर पर्यंत वाघाला जेरबंद करण्याची परवानगी वनविभागाला मिळाली आहे.