समुद्रपूर: गिरड येथील विद्यार्थ्यांनी रॅली काढून केली मतदार जनजागृती करिता:जास्तीत जास्त मतदान करण्याचे नागरीकांन आवाहन
समुद्रपूर:तालुक्यातील गिरड येथील विकास विद्यालयाच्या वतीने आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणूकात मतदारांनी मतदानामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी गावातील जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विकास विद्यालयातून मुख्य मार्गाने निघालेल्या या जनजागृती रॅलीच्या माध्यमातून हिंगणघाट उमरेड मुख्य रस्ता,डॉ. आंबेडकर प्रवेशद्वार,छत्रपती शिवाजी महाराज चौक,झेंडा चौक,ग्रामपंचायत चौक,श्रीराम मंदिर रोड ,महादेव मंदिर रोड,गणेश मंदिर, भारतमाता चौक,बस स्थानक भम्रण केले.