जळगाव शहरातील शिरसोली रस्त्यावरील गुलाबराव देवकर महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थिनीचा चक्कर येऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. महिमा चंदन वासनिक (वय १९, मूळ रा. भंडारा) असे मयत विद्यार्थिनीचे नाव असून, तिच्या निधनाने शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी २९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता तिच्या मैत्रिणींनी रुग्णालयात एकच आक्रोश केला होता.