धुळे: चिंता कायम! धुळ्यातील मंकी पॉक्स रुग्णाचा तिसरा अहवालही पॉझिटिव्ह
Dhule, Dhule | Oct 19, 2025 धुळे शहरातील मंकी पॉक्स रुग्णाचा तिसऱ्यांदा घेतलेला नमुना पुन्हा पॉझिटिव्ह आला असून, संक्रमण निश्चित झालं आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्णाच्या कुटुंबीयांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या रुग्णावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या तिसऱ्या पॉझिटिव्ह अहवालानंतर आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहे.