दिनांक 16 डिसेंबर च्या सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रतनारा येथे ऑटोरिक्षा क्रमांक एमएच 35 एएच 0056 या वाहनाला कुणाल मोहबे याने सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्यामुळे दवनीवाडा पोलिसांनी संबंधित ऑटोरीक्षा चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.