माण: पंढरपूर येथे संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यास लवकरच सुरुवात; मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती
Man, Satara | Nov 19, 2025 भक्तीची अखंड गंगा वाहणाऱ्या पंढरपूर नगरीत संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या अद्वितीय कार्याला समर्पित भव्य स्मारक उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. बुधवारी सकाळी आठ वाजता पंढरपूर येथे नामदेव शिंपी समाज बांधवांनी मंत्री गोरे यांची भेट घेऊन सत्कार केला. यावेळी समाज बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते.