खुलताबाद: महावितरणविरुद्ध आवाज उठवला म्हणून खोटे गुन्हे दाखल? सरपंच संदीप गायकवाड यांचा गंभीर आरोप!
बाजार सावंगी आणि परिसरातील महावितरण विभागाच्या बेफिकीर व गलथान कारभाराचा निषेध करत दरेगाव येथील सरपंच संदीप गायकवाड यांनी तक्रार दाखल केली होती.या कृतीचा बदला म्हणून त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असा त्यांनी गंभीर आरोप केला आहे.गायकवाड यांनी या संदर्भात खुलताबाद पोलिस ठाण्यात लेखी निवेदनाद्वारे तक्रार नोंदवली आहे.त्यांनी प्रशासनाकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे