खुलताबाद: चिखल उडाल्याच्या कारणावरून युवकावर चाकूने हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा, खुलताबाद उरूसातील घटना
खुलताबाद उरूसात चिखल उडाल्याच्या छोट्या वादातून 18 वर्षीय युवकावर धारदार चाकूने हल्ला झाला. शेख रेहान शेख अझर (रा. राजीव गांधी नगर) असे जख्मी तरुणाचे नाव आहे. खुलताबाद पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे की शेख रेहान हे आपल्या वडिलांसोबत सोनबावडीजवळ पानटपरी चालवत होते. १४ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास टपरी बंद करून घरी जात असताना दोन युवकांनी त्यांना अडवले आणि शिवीगाळ केली.वाद वाढल्यावर शेख सकलेन शेख मोईनने रेहानचा गळा पकडला, तर फैजान शेख भिकन शेखने धारदार चाकू मारला