भंडारा: शहरातील शितला माता मंदिर येथे बजरंग दलच्या रक्तदान शिबिराला माजी खासदार सुनील मेंढे यांची उपस्थिती
बजरंग दल भंडारा जिल्हा यांच्या वतीने आयोजित अमर बलिदानी रामभक्त बजरंगी कोठारी बंधू (राम कोठारी, शरद कोठारी) यांच्या बलिदान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन भंडारा शहरातील शीतला माता मंदिर येथे करण्यात आले होते. या शिबिराला दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता दरम्यान भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी उपस्थित बजरंग दल कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या समाजसेवेच्या व देशभक्तीच्या भावनेबद्दल मनःपूर्वक प्रशंसा..