वैजापूर: हडस पिंपळगाव शिवारात वाहनातून डिझेल चोरणाऱ्या एकाला पोलिसांनी केली अटक
समृद्धी महामार्गावर वाहनातून डिझेल चोरी करणाऱ्या टोळक्यातील एकाला पोलिसांनी १५ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास वाहनासह ताब्यात घेतले. तालुक्यातील हडसपिंपळगाव शिवारात चॅनल क्रमांक ४७० जवळ ही घटना घडली. याप्रकरणी प्रशांत गणेश गायकवाड (रा. कोळघर ता.जि.छ. संभाजीनगर) व त्याचे इतर तीन साथीदाराविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे