उमरेड: उमरेड नगर परिषदेच्या तेरा प्रभागासाठी आरक्षण झाले जाहीर, राजकीय पक्ष लागले कामाला
Umred, Nagpur | Oct 8, 2025 उमरेड नगर परिषदेच्या तेरा प्रभागासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमरेड शहरात कही खुशी काही गमचे वातावरण पाहायला मिळाले. काही जणांची आता निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा पूर्ण होणार तर काहीची अपूर्ण राहणार असे चित्र आज पाहायला मिळाले. दरम्यान आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आता कामाला लागले आहे. पर्यंत उमरेड नगरपरिषदेवर कोणत्या पक्षाचे राज्य असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.