धुळे: वडजाई रोड परिसरात प्रभाग २ व १९ मधील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात जाहीर प्रवेश
Dhule, Dhule | Sep 26, 2025 आगामी धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार फारुक शाह यांच्या नेतृत्वाला मोठे यश मिळाले आहे. वडजाई रोडवरील भव्य सोहळ्यात प्रभाग क्रमांक २ व १९ मधील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला. शाह यांच्या आमदारकीतील विकासकामांवर प्रभावित होऊन झालेल्या या प्रवेशामध्ये मुकेश कोळी, कल्पेश अहिरे, जयदीप सौंदाणकर, निवृत्त तहसीलदार फिरोज शाह मन्सुरी, अश्फाक पिंजारी आणि ‘नॅशनल ग्रुप’चे कार्यकर्ते सहभागी झाले.