जळगाव महापालिका निवडणूकीसाठी आमची भाजप सोबत झालेल्या बैठकीत २५ जागा शिवसेना शिंदे गटाला आणि ५० जागा भाजपाला सोडण्याचे ठरले होते. परंतू त्यानंतर दोन दिवसात महायुतीच्या प्रमुख घटक पक्षांसोबत काय बोलणं झालं हे मला माहित नाही. परंतू आम्ही महापालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. अशी प्रतिक्रीया शिवसेना शिंदे गटाचे आ.किशोर पाटील यांनी सोमवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता दिली.