हिंगोली: नदीजोड प्रकल्पातून हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करावा: माजी खासदार शिवाजीराव माने
हिंगोली महाराष्ट्र शासनाचा महत्त्वकांक्षी नदीजोड प्रकल्प होत असून या माध्यमातून पैनगंगा नदीचा वापर करीत हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा या पर्यायामुळे प्रस्तावित खरबी बंधार्याद्वारे वळविल्या जाणाऱ्या पाण्याचा प्रकल्प देखील आपोआप रद्द होईल असे आवाहन हिंगोली जिल्हा सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजीराव माने यांनी आज दुपारी तीन वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद बोलत होते.