कोपरगाव: माहेगावच्या तरुणाला लग्नाचे अमिश दाखवून लुटणाऱ्या टोळीला कोपरगाव तालुका पोलिसांनी केले जेरबंद
अविवाहित तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या एका हाय-प्रोफाइल टोळीचा कोपरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. माहेगाव (ता. कोपरगाव) येथील एका तरुणाला जालना येथील रोशनी अशोक पवार नावाच्या 'बनावट नवरी' सोबत लग्न लावून देत या टोळीने त्याच्याकडून तब्बल सव्वा दोन लाख रुपये उकळले. लग्नाच्या पहिल्याच रात्री पहाटे नवरीने पळ काढल्याने, तरुणाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी 'बनावट नवरी'सह पाच आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे