शहरातील बिंदूसरा नदीवरील पुल कामाची पाहणी
Beed, Beed | Oct 18, 2025 बीड शहरातील बिंदूसरा नदीवरील पुलाचे काम पावसाळ्यामुळे काही काळ खंडित झाले होते. आज शनिवार, दिनांक १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता, आमदार संदीप क्षीरसागर यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.या वेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाला गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. पावसाळा ओसरल्यानंतर कामाची गती वाढवून लवकरात लवकर पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश आमदार क्षीरसागर यांनी दिले असल्याची माहिती मिळाली आहे.