नरखेड: वृद्ध शेतकरी दांपत्याने घेतले विष, पतीचा मृत्यू तर पत्नीची प्रकृती गंभीर, कुंभार पेठ येथील दुर्दैवी घटना
Narkhed, Nagpur | Sep 15, 2025 कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका वृद्ध अल्पभूधारक शेतकरी दांपत्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दुर्दैवी घटनेत पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पत्नीची प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही हृदय द्रावक घटना नरखेड तालुक्यातील कुंभार पेठ गावात घडली. नामदेव संतोष बर्डे वय सत्तर वर्ष आणि त्यांची पत्नी लता बर्डे वही 62 वर्ष अशी या वृद्ध दांपत्याची नावे आहे.