कुंभमेळा प्राधिकरणातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात साधू–महंतांसोबत संवाद बैठक झाली. कुंभमेळ्यात नाशिकमध्ये 8 कोटी आणि त्र्यंबकेत 4 कोटी भाविक येण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष, घाटवाढ, पाणीपुरवठा योजना, साधूग्रामसाठी भूसंपादन, रस्ते-विस्तारीकरण, रेल्वे व विमानतळ क्षमता वाढ, तसेच टेंट सिटीचे नियोजन सुरू असल्याची माहिती सिंह यांनी दिली. सर्व कामे मे 2027 पर्यंत पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी नवीन शुद्धीकरण प्रकल्प होईल.