बोंडगावदेवी येथे आयोजित 'अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवा'त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. या महोत्सवादरम्यान विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी विशेष उपस्थिती दर्शवून स्पर्धकांचे कौतुक केले. खेळाडू आणि कलावंतांना प्रोत्साहन देताना ते म्हणाले की, अशा महोत्सवांमुळे ग्रामीण भागातील सुप्त गुणांना वाव मिळतो आणि जिल्हास्तरावर नवी ओळख निर्माण करण्याची संधी प्राप्त होते.