धरणगाव: पिंपळेसिम गावात ओट्यावर झोपण्यावरून एकाला बेदम मारहाण; धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल
धरणगाव तालुक्यातील पिंपळे सीम गावात घराच्या ओट्यावर झोपण्याच्या कारणावरून एका प्रौढ व्यक्तीला सात जणांनी शिवीगाळ करत दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तसेच मोबाईल रोख रक्कम आणि सोन्याची पेंडल जबरदस्तीने काढून घेतले. या संदर्भात शनिवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ७ जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.