राहाता: छगन भुजबळ यांचा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाना....!
आमचा मराठा समाजाला कुठलाही विरोध नाही. मराठा समाज व ओबीसींमध्ये आंतर पाडण्याचे काम आंतरवालीच्या पाटलांनी केले, असा घणाघाती आरोप करत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लक्ष्य केले. भुजबळ यांनी राधाकृष्ण विखे पाटील जरांगेंना जाऊन भेटतात, याकडे लक्ष वेधत हैदराबाद गॅझेटवरून काढलेल्या अध्यादेशावरून टीका केली. अध्यादेशातील पात्र हा शब्द एका तासात बदलून दिला जातो. कुणबीसाठी सकाळी अर्ज केला की