श्री सिद्धिविनायक गणपती देवस्थान, केळझर यांच्या वतीने बुधवार, दि. ७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता भव्य वारकरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला तालुक्यातील विविध भागांतील भजन मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत जुनोना येथील आबाजी महाराज भजन मंडळाने प्रभावी सादरीकरण करत ७,००० रुपयांचा प्रथम पुरस्कार पटकावला. ज्ञानेश्वरी भजन मंडळ, जामठा यांनी ५,००० रुपयांचा द्वितीय पुरस्कार, तर वारकरी भजन मंडळ आमगाव यांनी ३००० रुपयांचा तृतीय पुरस्कार मिळविला.