हिंगणघाट: शास्त्री वार्डातील उडाण पुलाजवळ नाकाबंदी करून पोलिसांची अवैध दारू वाहतूकी विरोधात कारवाई
हिंगणघाट शहरात दुचाकीने गावठी मोहा दारु वाहतूक करणाऱ्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने शास्त्री वार्डातील उडाण पुलाजवळ नाकाबंदी करून मोपेडसह दारु असा एकुण ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.प्राप्त माहितीनुसार हा आजनगाव गावाकडून शहराकडे गावठी मोहा दारूची मोपेड वाहनाने वाहतूक करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच पथकाने शास्त्री वार्डातील उडाण पुलाजवळ नाकाबंदी करून मोपेड अडवून कारवाई केली.