यवतमाळ: जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात 9 वी व 11 वी साठी अर्ज करण्यास मुदतवाढ
जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 9 वी व 11 वी सन 2026-27 करीता प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सुरू असून अर्ज करण्याची शेवटची दि. 21 ऑक्टोबर आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इयत्ता 9 व 11 करीता परीक्षा 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे.