गोंदिया: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात सुरु होणार स्वच्छतेचा जागर
ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान जीवनस्तर उंचावण्यासाठी राज्य शासनाकडून विविध अभियान राबविण्यात येतात. परिसर स्वच्छता व नागरिकांच्या सक्रिय सहभागातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पूर्ण अधिक जोमाने राबविण्यात येणार असून सन 2025- 26 या वर्षासाठी 11 ऑक्टोबर पासून या अभियानाची सुरुवात झालेली असून 30 जानेवारी 2026 पर्यंत सदर अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा स्वच्छतेचा जागर होणार आहे.