कोरेगाव: जम्पिंग जपांग फाडून ३० हजार रुपयांचे नुकसान; रेवडी येथील चौघांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रेवडी गावामध्ये जम्पिंग जपांग या जत्रेतील खेळण्याचे साहित्य फाडून तोडत सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी चौघांविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा आनंदा काळे हिने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फासेपारधी समाजाचे नेते पॅंथर विश्वास मोरे यांनी रविवारी सायंकाळी पाच वाजता पत्रकारांना याबाबत माहिती दिली. फिर्यादी पूजा काळे या कुटुंबीयांसह रेवडी येथे वास्तव्यास असून, गावातील पाटबंधारे कार्यालयासमोरील रिकाम्या जागेत यात्रेनिमित्त जम्पिंग लावले होते.