नेवासा: कानिफनाथ व शमीच्या वृक्षाचे दर्शन घेऊन केले सीमोल्लंघन #नेवासा #Newasa
दसऱ्याच्या निमित्ताने परंपरेनुसार चालत आलेल्या नेवासा शहराच्या पश्चिमेस खुपटी रोडवर असलेल्या जामदार व गायकवाड मळ्यातील कानिफनाथ मंदिरात व शमीच्या वृक्षाची तसेच खंडोबाचे सप्तशृंगी देवीचे हजारो ग्रामस्थांनी जाऊन पूजा करून एकमेकांना दसरा सणाच्या शुभेच्छा देत सीमोल्लंघन केले.. सीमोल्लंघन स्थळी आलेल्या भाविकांचे जामदार परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले.