उल्हासनगर मधून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका सोसायटीच्या सेक्युरिटी गार्डला एका डिलेवरी बॉय आणि त्याच्या सहकार्यांनी मिळून लाठीकाठीने बेदम मारहाण केले आहे. मारहाण होत असताना इतर व्यक्तींनी सोडवण्याचा प्रयत्न केला,मात्र तोपर्यंत बेदम मारहाण केली. इतर सुरक्षारक्षक सोडवण्यासाठी गेले असता त्यांना देखील मारण्याचा प्रयत्न केला. ही मारहाण का झाली याबाबत अद्याप पर्यंत कोणतीही माहिती मिळू शकली नाही परंतु व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.