धुळे तालुक्यातील तरवाडे गावाजवळ पोलिसांनी टाटा-407 वाहनातून सुमारे 3 टन गोवंश मांस जप्त केले. वाहनासह एकूण साडेनऊ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. पोलिस कर्मचारी संदीप गुरव यांच्या फिर्यादीवरून मालेगावचा मुश्रीफ शेख गुलाम (29) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला असून धुळे तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत.