कुही: तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने मांढळ येथे पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन
Kuhi, Nagpur | Oct 11, 2025 तालुक्यातील मध्यभागी असलेल्या मौजा मांढळ येथे कूही तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने 11 ऑक्टोबर शनिवारला दुपारी 1 वाजताच्या सुमारास पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यात आली. याप्रसंगी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष उपासराव भुते,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे, उपसभापती महादेव जिभकाटे, आदी मान्यवर आणी पदवीधर मतदार उपस्थित होते.