नांदुरा: कंडारी येथील २३ वर्षीय महिला बेपत्ता
नांदुरा तालुक्यातील कंडारी येथील २३ वर्षीय महिला बेपत्ता असल्याची नोंद बोराखेडी पोलिसात करण्यात आली आहे. पुनम सचिन भिसे असे बेपत्ता महिलेचे नाव असून सदर महिला ही घरी कोणाला काही न सांगता घरून निघून गेली आहे. तिचा नातेवाईकाकडे व आजूबाजूला शोध घेतला असता आढळून आली नाही. म्हणून तिच्या नातेवाईकांनी बोराखेडी पोलिसात हरवल्याची माहिती दिली आहे.याबाबत चा अधिक तपास पोलीस करीत असल्याची माहिती आज १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पोलिस सूत्रांनी दिली आहे.