साकोली: सेंदूरवाफा येथील टोलनाक्याजवळ ट्रकमध्ये डिझेल भरण्यासाठी थांबलेल्या ट्रकला मागेहून दुसऱ्या ट्रकची धडक,ट्रकचालकाचा मृत्य
राष्ट्रीय महामार्गावर सेंदूरवाफा येथील टोलनाक्याजवळ सोनाज हॉटेलच्यासमोर ट्रकमध्ये डिझेल भरत असताना सोमवार दि13ऑक्टोबरला पहाटे4च्या सुमारास मागवून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने डिझेल भरत असलेल्या ट्रकच्या चालकाचा मृत्यू झाला साकोली पोलीस ठाण्यात धडक देणाऱ्या ट्रकच्या चालक बरूनकुमार सानटा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला सहाय्यक पोलीसनिरीक्षक आशिष बोरकर हे अधिक तपास करीत आहेत ही माहिती साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी मंगळवार दि.14ला दुपारी1वाजता दिली