कोराडी पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नवीन कोराडी येथे छापा मार कार्यवाही करून प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याकडून आठ नायलॉन मांजाची चक्री किंमत सात हजार दोनशे रुपये जप्त करण्यात आला. अटकेतील आरोपीचे नाव भूपेश येडेकर असे सांगण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे