औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ रेल्वे तिकिटावर सुद्धा आता दिसणार छत्रपती संभाजीनगरचे नाव
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 26, 2025
आज दिनांक 26 सप्टेंबर सकाळी दहा वाजता औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव आता अधिकृतपणे ‘छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक’ असे करण्यात आले आहे. दक्षिण मध्य रेल्वेकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली असून नवीन स्थानक कोड CPSN असा असेल. आठवडाभरापूर्वी राज्य शासनाने अधिसूचना काढल्यानंतर काल रेल्वे प्रशासनानेही नावबदलाची अंमलबजावणी केली. यामुळे आता सर्व रेल्वे आरक्षण तिकिटे, वेळापत्रक व फलकांवर ‘छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक’ हेच नाव दिसणार आहे.