हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरात भव्य महारॅली उत्साहात संपन्न झाली. बुधवार दि. 21 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गांधी चमन ते शिवाजी चौक या मार्गावर निघालेल्या या महारॅलीने संपूर्ण शहर भक्तीमय वातावरणाने भारावून गेले. या महारॅलीत 27 शाळांचा सहभाग होता.