उदगीर: लेंढी धरणग्रस्तांच्या १८ मागण्या घेवून जैनोद्दीन पटेल यांची रावणगाव ते मुंबई पायी यात्रा
Udgir, Latur | Nov 1, 2025 रावणगाव ता मुखेड येथील लेंढी प्रकल्पात हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या,एक महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे रावणगाव येथील पाच घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली,परंतू आजपर्यंत धरणग्रस्तांना व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबियांना नांदेड येथील प्रशासनाने आर्थिक मदत दिली नाही,अशा विविध १८ मागण्यांसाठी रावणगाव येथील जैनोद्दीन पटेल यांनी रावणगाव ते मुंबई पायी यात्रा काढली असून १८ मागण्याचे निवेदन मुंबई येथे देणार असल्याची माहिती जैनोद्दीन पटेल यांनी माध्यमासमोर बोलताना दिली आहे