शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील लघु सिंचन योजनांची सातवी, जलसाठ्याची दुसरी प्रगणना वेळेत पुर्ण करणे आवश्यक आहे. या माध्यमातून चांगले काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी मंगळवार दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता बैठकीत दिले. लघुसिंचन योजनांची सातवी, जलसाठ्याची दुसरी प्रगणना तसेच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बैठकीस या बैठकीस मृद व जलसंधारण अधिकारी एस.एस.वाघमारे उपस्थित होते.