कुडाळ: तर राणेंचीही वैचारिक प्रगल्भता दिसली असती : राणे महाजन वादाबाबात माजी आमदार वैभव नाईक यांचा टोला
नारायण राणे आज ज्या भाजप पक्षात आहेत, तो पक्ष घडविण्याचे काम स्व. प्रमोद महाजन यांनी केले होते. त्याच प्रमोद महाजनांचे प्रकाश महाजन हे ज्येष्ठ बंधू आहेत, एवढे भान ठेवले असते तर नारायण राणेंचीही वैचारिक प्रगल्भता दिसली असती, अशी टिका उबाठा शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.