हिंगणघाट: सेवा पंधरवडा निमित्त उपजिल्हा रुग्णालयात स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानचा आमदार कुणावार यांच्या उपस्थितीत शुभारंभ
हिंगणघाट आज १७ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या सेवा पंधरवडा निमित्त हिंगणघाट शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या उपस्थितीत स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना आमदार समिरभाऊ कुणावार म्हणाले की आज प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते धार, मध्यप्रदेश येथे स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्यांचं अनुषंगाने आपल्या हिंगणघाट येथे देखील हे अभियान सुरु करण्यात आले आहे.