मावळ: डोणे गावातील अवैध दारूभट्टी केली उध्वस्त
Mawal, Pune | Oct 22, 2025 हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी वडगाव मावळ पोलिसांनी मोठी कारवाई करीत डोणे गावच्या हद्दीत छापा टाकला. या कारवाईत अवैध दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य आणि तयार दारू असा एकूण १,६५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.