“मतदानाच्या दिवशी हाताचा पंजा दिसला की नक्की शिक्का मारा. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस कायम तुमच्या सोबत उभी आहे,” असे आवाहन मंद्रूप जिल्हा परिषद गटाच्या काँग्रेसच्या उमेदवार सना कौसर मोहम्मद शेख यांनी केले. आज मंद्रूप येथील ग्रामदैवत श्री मळसिद्धाप्पा मंदिरात त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी झालेल्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सना कौसर शेख यांनी आपल्या भाषणात ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, रस्ते, महिला व युवकांसाठी रोजगाराच्या संधी, तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी यावर भर दिला.