महाड: गीताबाग, सुतारवाडी येथील खासदार सुनील तटकरे यांच्या कार्यालयात रायगड लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी घेतली भेट
Mahad, Raigad | Sep 22, 2025 आज सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास गीताबाग, सुतारवाडी येथील खासदार सुनील तटकरे यांच्या कार्यालयात रायगड लोकसभा मतदारसंघातील विविध भागांतील नागरिकांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान नागरिकांनी त्यांच्या समस्या, मागण्या व प्रलंबित विषय माझ्यासमोर मांडले. सर्वांचे प्रश्न काळजीपूर्वक ऐकले व काही तातडीच्या समस्या त्वरित सोडवून दिल्या. उर्वरित समस्यांबाबत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या असून, योग्य ती कार्यवाही लवकरच केली जाईल.