धुळे: ऐन दिवाळीत आदिवासी कुटुंबावर दुःखाचा डोंगर, वरखेडी शिवारात शॉर्टसर्किटने झोपडी जळून खाक, संसार उघड्यावर
Dhule, Dhule | Oct 19, 2025 धुळे शहराजवळच्या वरखेडी शिवारातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. ऐन दिवाळीच्या सणात एका आदिवासी कुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. येथे शेतात राहणाऱ्या अनिल सोनवणे यांच्या झोपडीला शॉर्टसर्किटने आग लागून मोठे नुकसान झाले. या शेतातील झोपडीवरून विजेच्या तारा धोकादायकपणे लोंबकळत होत्या. शुक्रवारी रात्री जेवणानंतर सोनवणे कुटुंब झोपी गेले असताना, शनिवारी पहाटे अचानक शॉर्टसर्किटमुळे आगीचा भडका उडाला. सुदैवाने, आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने संपूर्ण कुटुंब झोपडीबाहेर धावत सुटले होत.