भंडारा: भावाला ओवाळणी करिता जातांना अपघात बाप लेक जागीच ठार ! चिखली गावात शोककळा
अड्याळ जवळील ३ किलो मीटर अंतरावर असलेल्या चिखली गावातील लवा सोनुजी बारसागडे वय ४५ वर्ष व मुलगी सलोनी लवा बारसागडे वय २२ वर्ष ही एम ए द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती. हे सकाळीं चिखली येथुन साडे 6 सुमरास आपल्या एम एच ३६ ए पी ९८६७ या दुचाकी वाहनाने वर्धा करिता भावाच्या मुलाला ओवाळणी करिता मुलीला घेऊन निघाले असता बायपास उमरेड बुट्टी बोरी पोलीस स्टेशन हद्दीतील ठाणा खापरी रोड वर सवा 8 दरम्यान काळाने घाला घातला. एका अज्ञात ट्रकने धडक दीली. अपघातात दोन्ही जागीच ठार झाले.