जालना: पोलीसांनी जाणीवपूर्वक अन्यायकारक भूमिका घेतल्याचा आरोप; भारतीय दलित पँथरकडून सुभानपूर प्रकरणात कारवाईची मागणी
Jalna, Jalna | Nov 2, 2025 भोकरदन तालुक्यातील सुभानपूर येथे बौद्ध समाज आणि मराठा समाज यांच्यात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा बसविण्याच्या जागेवरून सुरु झालेला वाद आता गंभीर वळणावर गेला आहे. या प्रकरणात दलित समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करत भारतीय दलित पँथरकडून प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. रविवार दि. 2 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करुन कारवाईची मागणी संस्थापक अध्यक्ष अॅड. रमेश खंडागळे यांनी केली.