डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापराचा गैरफायदा घेत व्यावसायिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीचा अंजनगाव सुर्जी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बनावट फोन-पे अॅपद्वारे सराफाची फसवणूक करणाऱ्या दोन सायबर भामट्यांना अटक करत पोलिसांनी १ लाख ३१ हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.अंजनगाव सुर्जी येथील सराफा लाईनमधील ‘गुणगुण ज्वेलर्स’ या दुकानात 23 डिसेंबर 2025 रोजी ही घटना घडली.