हिंगणा: जामठा येथे पडीक बांधकामाच्या खोलीत जुगारअड्डा, चार आरोपी ताब्यात
Hingna, Nagpur | Sep 11, 2025 पडीक बांधकामाच्या खोलीत जुगार खेळणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हिंगणा पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. ही कारवाई करण्यात आली. जामठा येथील वैनगंगा ले आउटमधील पडीक बांधकाम असलेल्या उघड्या खोलीत जुगार सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन धाड टाकली असता तेथे आकाश राजू बोरघरे,कौशिक संजय सावंत, प्रशांत गोपालराव वाठ व किशोर कोचे हे जुगार खेळताना दिसले.